Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाICC ने जाहीर केले दशकातील सर्वोत्तम खेळाडू, धोनी-विराटचा बोलबाला

ICC ने जाहीर केले दशकातील सर्वोत्तम खेळाडू, धोनी-विराटचा बोलबाला

दिल्ली l Delhi

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज 28 जानेवारी, 2020 रोजी वर्षातील पुरस्कार जाहीर केले आहेत. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या पुरस्कारामध्ये भारताचा

- Advertisement -

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दशकातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर (ODI Player of The Decade) तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू ठरला तर एमएस धोनीला (MS Dhoni) खेळाडूवृत्ती पुरस्कार म्हणजेच स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विराट कोहलीनं २०१० ते २०२० या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडूलकरचा १२ हजार धावांचा विक्रम मोडीत काढला. गेल्या दशकात ३९ शतकं, ४८ अर्धशतकं आणि ११२ झेल घेणारा कोहली एकमेव फलंदाज आहे. कोहलीनं दशकात १० हजारपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. त्यामुळेच विराट कोहलीची दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा सर गॅरी सोबर्स पुरस्कारासाठीही विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे.

२०११ मध्ये नॉटिंघम येथे झालेल्या कसोटी मालिकेत धोनीनं सर्वांचं मनं जिंकलं होतं. या सामन्यात पंचानी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला चुकीच्या पद्धतीनं धावबाद दिलं होतं. त्यानंतर धोनीनं मोठं मन करत बेलला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. धोनीच्या या खेळभावनेमुळे त्याला दशकातील सर्वोत्तम ‘खेळभावना’ पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं आहे. स्मिथनं दशकात कसोटी क्रिकेटमध्ये २६ शतकासह सात हजार ४० धावा काढल्या आहेत. अफगाणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये राशिदच्या नावावर सर्वाधिक विकेट आहेत.

दशकातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय, टी-२० क्रिकेटपटू आणि रेचेल हेयोइ फ्लिंट पुरस्कारावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीनं नाव कोरलं आहे.

खेळाडूची पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विटरवर गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन व्होटिंग पद्धत सुरु केली होती. या ऑनलाईन पद्धतीने नामांकन मिळालेल्या आपल्या आवडत्या खेळाडूला मतप्रक्रिया सुरु ठेवली होती. या प्रक्रियेद्वारे पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या