Friday, December 13, 2024
Homeदेश विदेशOLA e-scooter भारतात झाली लाँच; जाणून घ्या स्कूटरची खास वैशिष्ठे

OLA e-scooter भारतात झाली लाँच; जाणून घ्या स्कूटरची खास वैशिष्ठे

दिल्ली | Delhi

ओला कंपनीने (Ola Electric) भारतीय मार्केटमध्ये आपली पहिली-वहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Ola electric scooter launch date) आज लाँच केली आहे. OLA e-scooter दोन वेरिएंट S1 आणि S1 Pro मध्ये लाँच केली आहे. S1 एक रिवॉल्यूशनरी प्रोडक्ट (Revolutionary product) असून याची किंमतही रिवॉल्यूशनरी (Revolutionary price) आहे.

- Advertisement -

Ola S1 Electric Scooter किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या Ola S1 Electric Scooterची किंमत 99,999 (Ex-showroom) आहे, तर Ola S1 Pro Electric Scooterची किंमत 129,999 रुपये आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, ग्राहकांना वेगवेगळ्या सबसिडीचा लाभ मिळेल, जसे की दिल्लीनंतर राज्य आणि FAME सबसिडी, Ola S1ची किंमत 85,099 रुपये आणि Ola S1 Proची किंमत 110,149 रुपये (Ex-showroom) आहे.

या नव्या Ola Electric Scooter ची लांबी 1860 मिमी, रुंदी 700 मिमी आणि उंची 1155 मिमी आहे. Ola Electric चे वजन 74 किलो आहे. Ola Electric ने दावा केला आहे की या नव्या Electric Scooter ला चाबीची (Key) गरज असणार नाही. ग्राहक ही स्कूटर मोबाईल अॅपच्या (Mobile App) साहाय्याने सुरू करू शकतील. त्याचबरोबर Scooter मध्ये 7 इंची टचस्क्रीन डिस्प्ले (Touchscreen display) असणार आहे. त्यात जीपीएस नॅव्हिगेशनची (GPS navigation) माहिती दिसणार आहे. शिवाय या स्क्टूरमध्ये 4G कनेक्टिविटी मिळणार असून युट्युब (Youtube) आणि व्हॉईस कॉलिंग (Voice Calling) करता येणार आहे.

Ola Electric Scooter फक्त 50 टक्के चार्ज असल्यावरही 75 किमी प्रवास करू शकणार आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर Scooter 150 किमी चालणार आहे. Ola Electric 18 मिनिटांमध्ये 50 टक्के चार्ज होणार आहे. शून्यातून पूर्ण चार्ज होण्यासाठी स्कूटरला अडीच तास लागणार आहेत. घरातील वापराच्या नॉर्मल प्लगवर स्कूटर पूर्ण चार्ज (Scooter charge on normal plug) होण्यासाठी साडेपाच तास लागणार आहेत.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर 10 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यात निळा, काळा, लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा आणि सिल्व्हर शेडचा समावेश आहे. स्कूटरची विक्री 8 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या