नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथील जम्मू-पुच्छ महामार्गावरील अखनूरमधील तांडा वळणावरील दीडशे फूट खोल दरीत बस (Bus) कोसळून भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २१ जणांचा मृत्यू तर ४० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरस येथून जम्मूतील शिव खोडी येथे जात होती. या बसमधून सुमारे ५० ते ६० जण प्रवास करत होते. त्यावेळी बस अखनूर येथील तांडा या वळणार आली असता दीडशे फुट खोल दरीत कोसळली. हा अपघात घडल्यानंतर बसमधील प्रवाशांचा एकच आरडाओरडा सुरू झाला. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर
पोलीस, नागरिक आणि एसडीआरएफ, एनडीआरएफच्या पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यानंतर जखमींना अखनूर येथील स्थानिक रुग्णालयात व जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरु आहे.