Tuesday, October 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजटोळक्याच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

टोळक्याच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

तीन जण ताब्यात

नाशिक। प्रतिनिधी Nashik

राग डोक्यात ठेऊन कट रचत टोळक्याने मंगळवारी भल्यासकाळी एका तरुणावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना पंडीत कॉलनीत घडली. हल्ला झालेल्या तरुणास उपचारार्थ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून जिल्हा शासकीय रुग्णालय व पुन्हा दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, दुपारी साडेचार वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे (वय २१, रा. घारपुरे घाट, अशाेकस्तंभाजवळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

या हत्येप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. या घटनेमुळे पंडीत कॉलनीसह घारपुरे घाट परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता. अतिशय क्रूररित्या व कट रचून पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या