Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार लोकसभा मतदार संघात २१०० घरकुले मंजूर

नंदुरबार लोकसभा मतदार संघात २१०० घरकुले मंजूर

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

पंतप्रधान आवास योजना (Prime Minister’s Housing Scheme) शहरी अंतर्गत केंद्र सरकारने नंदुरबार लोकसभा मतदार (Nandurbar Lok Sabha constituency) संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील घरकुलांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रात एकुण २ हजार ९१ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती खा.डॉ.हीना गावित (M.P.Dr. Heena Gavit) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

- Advertisement -

प्रत्येक बेघर व्यक्तीला त्याच हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने शहरी पंतप्रधान आवास योजना तयार केेली आहे. यासाठी खा.डॉ.हिना गावीत या स्वत: आपल्या लोकसभा मतदार संघातील प्रत्येक नगरपालिकेतील शहरी भागातील गोर गरीबांना घरकुल मिळण्यासाठी पाठपुरावा करत होत्या. त्या पाठपुराव्याला यश मिळाले. खा.डॉ.गावित यांनी जिल्हा सनियंत्रण (दिशा समिती) समितीच्या अध्यक्षा या नात्याने आपल्या मतदार संघात असलेल्या सर्व नगरपालिकेतील मुख्याधिकार्‍यांना सुचना दिल्या आहेत.

जे लोक या आराखड्यामध्ये सुटले असतील त्यांचेही अर्ज मागवावेत व त्यांना पण या आराखाड्यामध्ये समाविष्ठ करुन नविन आराखडा तयार करुन केंद्र सरकारला पाठवावा, असे आदेश दिले आहेत. जे लोक घरकुल योजनेतुन सुटले असतील त्यांनी या योजने अंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावे. जसे आता केंद्रसरकारकडुन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर करुन आणले तसेच उर्वरीत घरकुल सुध्दा मंजुर करण्यात येतील, असे आवाहन खा.गावित यांनी केले आहे.

नंदुरबार नगरपालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात २५० व दुसर्‍या टप्प्यात १०५ घरकुले, नवापूर नगरपालिकेत पहिल्या टप्प्यात ३९ व दुसर्‍या टप्प्यात १०० घरकुले, शहादा नगरपालिकेत पहिल्या टप्प्यात १५० व दुसर्‍या टप्प्यात २५५ घरकुले, धडगांव नगरपंचायतमधे ३५० घरकुले, तळोदा नगरपालिकेत ३०० घरकुले, शिरपुर नगरपालिकेत पहिल्या टप्प्यात १०० व दुसर्‍या टप्प्यात ४०० घरकुले, साक्री नगरपालिकेत ४२ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. अशी माहिती खा.डॉ.हिना गावित यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या