Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ९ हजार ६०५ कोटींचा हिशोब कोण...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ९ हजार ६०५ कोटींचा हिशोब कोण देणार? – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा सवाल

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यात जून २०२६ पर्यंत तब्बल ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ९ हजार ६०५ कोटी रुपये वितरित झाल्याचे समोर आले असून याचा हिशोब कोण देणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शनिवारी केला.

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जवळपास ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ९ हजार ६०५ कोटी रुपये जमा झाल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आज एक्स या समाज माध्यमातून सरकारवर टीका करत याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

ई-केवायसी न करणे, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, सरकारी कर्मचारी असणे किंवा एकाच कुटुंबातून अनेक अर्ज असणे अशी अपात्रतेची कारणे असताना हे पैसे खात्यात जमा होईपर्यंत प्रशासन झोपले होते का? योजना लागू करण्यापूर्वी छाननी का झाली नाही? अपात्र लाभार्थ्यांना सरसकट हप्ते का दिले गेले? आणि या हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? लाडकी बहिणींच्या नावाखाली पैशाचा अपहार झाला का? असे सवाल पाटील यांनी केले आहेत.

गरजू महिलांना मदत मिळायलाच हवी; पण जनतेच्या पैशांचा असा निष्काळजीपणे वापर समर्थनीय नाही. त्यामुळे सरकारने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, अपात्र लाभार्थ्यांना झालेले वितरण कसे झाले याचा हिशोब जनतेसमोर मांडावा आणि प्रत्येक स्तरावरील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : कट्टा एमपीचा अन् धमाका नाशिकमध्ये; पन्नास हजारांत...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik मध्य प्रदेशातून बेकायदेशिरपणे गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) आणून नाशिक व पुणे शहरात (Nashik and Pune City) बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक...