Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबार22 बालकांना मिळाली नवसंजिवनी

22 बालकांना मिळाली नवसंजिवनी

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा शल्यचिकीत्सक (District Surgeon) डॉ. चारुदत्त शिदे यांच्या पुढाकाराने दुर्धर आजारग्रस्त (Severely ill) 22 बालकांना नवसंजिवनी (Revitalizing children) मिळाली असून बालकांना पुढील शस्त्रक्रियेसाठी (surgery) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रवाना केले.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हा हा आकाक्षीत जिल्हा असून गरोदर माता (Pregnant mother) व कुपोषीत बालकांचे (malnourished children) प्रमाण जिल्हयात अधिकचे आढळुन येतात त्याकरीता नंदुरबार जिल्हा रुग्णालयात याची अधिकची काळजी घेतली जाते व त्याकरीता स्वतंत्र कक्ष जिल्हयात कार्यान्वयीत आहे तसेच बालकांची काळजी घेणेसाठी राष्ट्रीय बालसंगोपन कार्यक्रम (National Childcare Program) अंतर्गत जिल्हयातील शस्त्रक्रिया करण्याची गरज असणारे एकुण 22 हृद्यविकार व कीडनी विकार, मुत्रपिंड व यकृताचे विकार, तसेच इतर दुर्धर आजारांनी त्रस्त (Suffering from chronic diseases) बालकांना पुढील शस्त्रक्रियेसाठीजिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने हिरवी झेंडी दाखवुन रवाना केले.

यावेळी अतीरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के. डी. सातपुते, डॉ. राजेश वसावे, बालरोग तज्ञ डॉ. किसन पावरा तसेच आरबिएसके ने कार्यक्रम समन्वयक धिवरे,मनोज चौधरी व जिल्हा एड्स विभागाचे प्रमुख नितीन मंडलीक आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या