Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संपर्क कार्यालयात अजितदादांना अभिवादन

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संपर्क कार्यालयात अजितदादांना अभिवादन

​ओझे l विलास ढाकणे Oze

- Advertisement -

​महाराष्ट्र राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

​या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोकुळ झिरवाळ यांनी अजितदादांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला. अजितदादा पवार हे शिस्तबद्ध व प्रशासनावरील मजबूत पकड आणि तत्पर निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि केलेले कार्य घराघरात पोहोचवणे हीच आपल्या सर्वांची खरी जबाबदारी आहे असे आवाहन गोकुळ झिरवाळ यांनी केले.

यावेळी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुकाध्यक्ष क्रुष्णा मातेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे,माजी सरपंच प्रितम देशमुख, माजी उपनगराध्यक्षा शैलाताई उफाडे,हिरामण गावित, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिकेत बोरस्ते, युवक शहराध्यक्ष प्रतिक जाधव,विकी घोलप, सत्यजित राजे, रघुनाथ पाटील, नगरसेवक दिपक जाधव,सलीम मिर्झा,जहिर शेख, प्रसाद जोशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नाव्हेेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक...