Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर; उद्या मौन आंदोलन...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर; उद्या मौन आंदोलन करणार

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमधील गांधी स्मारकात मौन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार आहेत. साकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे हे आंदोलन करणार आहेत. आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी अण्णा हजारे सरकारकडे करणार आहेत. तसेच आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात आले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरात आंदोलन सुरू असून, दिल्लीतील जंतर-मंतरवरही आंदोलन तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत स्वतः आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

भ्रष्टाचारविरोधी आणि लोकपाल आंदोलनातून देशभरात मोठी जनजागृती घडवून आणणारे अण्णा हजारे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरत असल्याने त्यांच्या या भूमिकेकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : माजी मंत्री ​नवाब मलिकांचे नाव वापरून २५...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव आल्याचा बनाव रचून, कुटुंबीयांना कारागृहात पाठवण्याची भीती...