नवापूर । श.प्र.Navapur
तालुक्यातील चरणमाळ घाटाच्या पायथ्याशी पोलीसांनी अवैध दारूच्या वाहतूकीवर धडक कारवाई करत 22 लाख 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दि.12 जून 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना नवापूर, गुजरात राज्यातील व्यारा व चलथान येथील काही इसम एकत्र येवून चारचाकी वाहन (क्रमांक एमएच 20 ईएल-3177) ने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली व दादरा-नगर हवेली आणि दिव व दमन येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारु अवैधपणे विक्री करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, चरणमाळ घाट, नवापूरमार्गे गुजरात राज्यात वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री.पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना कारवाईचे आदेश दिले.
नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने चरणमाळ घाटाच्या पायथ्याशी सापळा रचला. चरणमाळ घाटाकडून येणार्या वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री दि.13 जून 2023 रोजी सकाळी 4.30 च्या सुमारास एक चारचाकी मोठे वाहन व त्याच्या पाठीमागे एक काळ्या रंगाचे स्कॉर्पीओ वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले, पोलीस पथकातील अमंलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेला. म्हणून त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहन चालकाने सदरचे वाहन नवापूर तालुक्यातील बोरझर फाट्यावर सोडून तीन इसम काळ्या रंगाच्या वाहनामध्ये बसून तेथून पळून गेले. सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात मद्यसाठा आढळून आला.
12 लाख 57 हजार 840 रुपये किमतीच्या खाशिीळरश्र इर्श्रीश करपव झळलज्ञशव ॠीरळप थहळीज्ञू चे 301 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम.एल.च्या एकुण 14 हजार 448 नग काचेच्या बाटल्या, 1 लाख 02 हजार रुपये किमतीचे श्रश्र डशरीेपी ॠेश्रवशप उेश्रश्रशलींळेप ठशीर्शीींश थहळीज्ञू चे 25 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम.एल.च्या एकुण 1200 नग काचेच्या बाटल्या, 10 लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्रमांक एमएच20 ईएल 3177) असा एकुण 22 लाख 57 हजार 840 रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला असून वाहन सोडून पळून गेलेले तीन संशयीत आरोपी व काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओ वाहनातील दोन आरोपी यांच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.