Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआज ‘देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार’ सोहळा

आज ‘देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार’ सोहळा

कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्वतःच्या जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर विविध क्षेत्रांत यशाचे शिखर गाठणार्‍या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘देशदूत’ समूहातर्फे आयोजित ‘देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०२६’ हा दिमाखदार सोहळा रविवार, दि. २२ मार्च रोजी पार पडणार आहे. नाशिक-पुणे रोडवरील नंदिनी पुलाजवळील मनासिलबफ येथे सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा संपन्न होईल.

शिक्षण, आरोग्य, प्रशासन, समाजसेवा आणि उद्योजकता यांसारख्या विविध क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या महिलांना यावेळी विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रेरणादायी व्यक्तींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याची ‘देशदूत’ची परंपरा या निमित्ताने पुढे जपली जाणार आहे.

महिलांच्या संघर्षाला योग्य ओळख मिळवून देणे आणि त्यांच्या अतुलनीय कार्याला दाद देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नसून तो स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा खर्‍या अर्थाने उत्सव ठरेल, असे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. या उपक्रमासाठी सोनी पैठणी, टकले ज्वेलर्स (कॉलेज रोड) आणि इंडियन ऑइल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

सेलिब्रिटींच्या उपस्थितीने रंगत वाढणार
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्रपट आणि कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्रींची उपस्थिती. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर, अश्विनी कासार, रूचिता जाधव, माधुरी पवार, अदिती सारंगधर, सोनाली पाटील, आरती सोळंकी आणि गायिका मुग्धा खराडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच अभिनेत्री व निवेदिका दीप्ती भागवत या सोहळ्याचे सूत्रसंचालन करतील. नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिकच तारांकित आणि संस्मरणीय ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Kerala CM : केरळमच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला; काँग्रेसकडून ‘या’ नेत्याच्या नावावर...

0
नवी दिल्ली | New Delhi नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections) भाजपला पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीत यश मिळाले होते. तसेच...