Tuesday, April 29, 2025
Homeनाशिकनाशिकमध्ये आज नवे २२ कोरोना संशयित रुग्ण दाखल; अद्याप ७२ संशयितांचे नमुने...

नाशिकमध्ये आज नवे २२ कोरोना संशयित रुग्ण दाखल; अद्याप ७२ संशयितांचे नमुने प्रलंबित

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये विविध भागातून आज २२ कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. तर आतापर्यन ३१७ जणांचे घशाचे नमुने घेण्यात आले असून यापैंकी २४३ नमुने निगेटिव्ह आले आहेत तर अद्याप ७२ संशयितांचे नमुने प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये आतापर्यंत दोन रुग्ण कोरोना पाझिटिव्ह आहेत. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. आतापर्यंत बाहेरील देशातून जवळपास ८७१ रुग्ण आले असून त्यापैंकी ५८४ नागरिकांचे १४ दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. आज एकूण २८७ जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

नाशिक मध्ये आज नवीन एकूण २२ रुग्ण दाखल झाले असून यात नाशिक जिल्हा रुग्णालयात चार, मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पाच तर कठडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १३ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

या रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उदया सायंकाळपर्यंत या रुग्णांचे अहवाल मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील १३ रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहेत तर मालेगाव सामान्य रुग्णालयातील १८   आणि  डॉ झाकीर हुसेन रुग्णालयातील ४१    असे एकूण ७२ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....