Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर | प्रतिनिधी |Ahmednagar

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील करोना टेस्ट लॅबमध्ये आज २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील १५, श्रीगोंदा येथील ०७ आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ३१५ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी झाली आहे.

- Advertisement -

आज बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील ०१, श्रीगोंदा येथील झेंडा चौक येथील ०५ तसेच श्रीगोंदा शहरातील एक आणि तालुक्यातील वडळी येथील एक जण बाधित आढळून आले.

नगर शहरात गवळी वाडा येथील ०९, चितळे रोड ०१, झेंडी गेट ०१, आणि शहराच्या मध्यवस्तीत ०४ जण बाधित आढळून आले आहेत. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी ही माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या