Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसहकार व शिक्षण महर्षी चांगदेवराव होळकर यांचे निधन

सहकार व शिक्षण महर्षी चांगदेवराव होळकर यांचे निधन

लासलगाव । प्रतिनिधी Lasalgaon

- Advertisement -

सहकार व शिक्षण महर्षी चांगदेवराव भागवतराव होळकर( वय ९५ )यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले असा परिवार आहे.
के जी एस शुगर कारखान्याचे व येथील वेफको संस्थेचे चेअरमन संजय होळकर यांचे वडील होत.दैनिक ‘देशदूत’ तर्फे त्यांना काही महिन्यांपूर्वी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कै. होळकर यांच्या कार्याच्या अल्पपरिचय
चांगदेवराव होळकर यांनी वयाच्या 20 व्या वर्षी राजकीय कारकिर्दीला लासलगाव ग्रामपंचायत पासून सुरुवात केली ते पंधरा वर्षे सदस्य आणि एक वेळा सरपंच होते. लासलगाव खरेदी विक्री संघाची ते 40 वर्षे संचालक व चेअरमन भूषविले होते. तर राष्ट्रीय स्तरावरील नाफेड या संस्थेवर सलग आठ वेळेस संचालक म्हणून बिनविरोध विजय होऊन नाफेडचे चेअरमन व व्हा. चेअरमनपद ही भूषविले होते. नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (एन एच आर डी एफ) या संस्थेचे चेअरमनपद त् तसेच नॅशनल टुरिझम को-ऑपरेटिव्ह लि. (कोपटूर )नवी दिल्ली कोणार्क ज्यूट लिमिटेड भुवनेश्वर तसेच नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ओनियन अँड गार्लीक राजगुरुनगर या संस्थेचे संचालकपद भूषविले.

लासलगाव येथे शेतकरी हितासाठी 40 वर्षांपूर्वी त्यांनी भाजीपाला व फळबाग सहकारी खरेदी विक्री संस्था (वेफको) ही संस्था स्थापन करून या संस्थेचे ते सुमारे 30 वर्ष चेअरमन होते.लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अनेक वर्ष चेअरमन तर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अनेक वर्ष संचालक पद भूषवतत्यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. भारतीय रेल्वे बोर्डावर शेतकरी प्रतिनिधी म्हणून त्यांनी शेतीमाल वाहतुकीला चालना देत शेतकरी हित जोपासले.

राष्ट्रीय स्तरावरील त्यांची कार्याची नोंद घेत इंडियन पब्लिशिंग हाऊस तर्फे बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते
कै .बाळासाहेब वाघ कै.भाऊसाहेब हिरे यांच्यासह राष्ट्रीय पातळीवर त्यांना भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार ,बळराम जाखड, नवल किशोर शर्मा, बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार गुजरातचे माजी मंत्री वल्लभभाई पटेल यांच्या समवेत कार्याची संधी मिळाली होती.

ताज्या बातम्या

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला वृद्धाचा बळी

0
कोल्हार |वार्ताहर| Kolhar राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा (Chincholi Phata) परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ (Dog Attack) घालत एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी (Senior Citizens Death) घेतल्याची...