Saturday, July 25, 2026
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत

दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी २४ तासांपासून युद्धपातळीवर कार्यरत

- Advertisement -

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी- दिंडोरी तालुक्यातील करंजवण लखमापूर वनी दिंडोरी आशावाडी येथे गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह सततच्या मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ३३ केव्ही, ११ केव्ही व एलटी वीजवाहिन्या तसेच वीज रोहित्रांचे (डीपी) मोठ्या प्रमाणात अंदाजे 20 ते 25 लाखाचे नुकसान झाले असून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला असताना अशा या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महावितरणचे सर्व अधिकारी, अभियंते व कर्मचारी मागील २४ तासांपासून अखंडपणे मैदानात उतरून युद्धपातळीवर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करत आहेत. पावसाची सततची संततधार, चिखल, दुर्गम भाग तसेच प्रतिकूल हवामानाचा सामना करत कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत.

महावितरणकडून तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करणे, पडलेले विद्युत खांब व झाडे हटविणे, नुकसानग्रस्त रोहित्रे बदलणे आणि शक्य तितक्या लवकर सर्व भागांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, तुटलेल्या वीजवाहिन्या, विद्युत खांब किंवा इतर विद्युत उपकरणांच्या जवळ जाऊ नये तसेच अशा घटना आढळल्यास त्वरित महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी किंवा वीज ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

महावितरण प्रशासनाने नागरिकांना सहकार्य व संयम राखण्याचे आवाहन केले असून, वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सांगितले आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता अनिल थोरात व कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांचे मार्गदर्शनाखाली दिंडोरी येथील अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...