Sunday, October 13, 2024
Homeजळगावजिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात 23 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात 23 जणांचा मृत्यू

जळगाव – jalgaon

जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

प्रथमोपचार, आणि अंधश्रध्दा निर्मुलन यावर कार्य करत आहेत. तर संस्थेचे सर्पमित्र वनविभागाच्या मार्गदर्शनात सर्प रेस्क्युचे काम करत असतात. आतापर्यंत सर्पदंशाच झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. दंश झाल्यावर असे उपचार तात्काळ शक्य होतात असे नाही. अशावेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत प्रथमोचार जीवनावश्यक असतात.

पावसाळा सुरू झाला की शेतकरी शेतीची कामे करायला लागतात, अडगळीत पडलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात, जनावरांचे गोठे साफ होतात. जळाऊ सरपण काढले जाते, शेती मशागतीच्या कामांना वेग येतो हाच काळ असा आहे. ज्यात सापांचा वावर वाढतांना दिसून येतो अनेक नागरिक सापांना मारतात तर काही नागरिक साप वाचवण्यासाठी प्रयत्न करतात अश्यावेळी सापाचा आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्र मोलाची भूमिका बजावतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या