Saturday, September 14, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात वृद्धेला चाकू, बंदुकीचा धाक दाखवून २३ तोळे सोने लंपास

नंदुरबारात वृद्धेला चाकू, बंदुकीचा धाक दाखवून २३ तोळे सोने लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar

- Advertisement -

शहरातील जुनी सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिराजवळ काल मध्यरात्री दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील तसेच कपाटातील ६ लाख ७९ हजार ८०० रुपये किमतीचे २३.५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. वृद्ध दांपत्याने तीन दरोडेखोर असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप अधीक्षक संजय महाजन, एलसीबी चे किरण खेडकर, उपनगरचे अजय वसावे, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी भेट दिली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नेहरु पुतळ्याजवळ जयहिंद ईलेक्ट्रॉनिक्सचे मालक नरेशकुमार लेखराज नानकाणी यांचे जुनी सिंधी कॉलनीत झुलेलाल नगरात राहतात. त्यांच्या घरात वडील लेखराज खिलुमल नानकाणी, आई मिरादेवी, पत्नी पिंकी, मुले गुंजन व कार्तीक सोबत राहतात. आज दि.२० सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेदरम्यान घरात सर्व जण झोपलेले असतांना त्यांच्या घरातील स्वयंपाक घरातील खिडकीची जाळी तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांनी मिरादेवी यांच्या गळ्यावर चाकु ठेऊन धाक दाखवुन अंगावरील सोन्याचे दागीने जबरीने काढले. त्यावेळी आरडाओरड केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने जबरीने काढत असतांना कपाट उघडण्याचा आवाज आल्याने लेखराज नानकानी यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कशाने तरी डोक्यावर मारुन दुखापती केले. ओरडले तर गोळी मारण्याची धमकी दिली. सोन्याचे दागीने जबरीने घेऊन पळुन गेले.

लेखराज नानकानी यांच्या सांगण्याप्रमाणे तिघा अनोळखी चोरांपैकी एकाने त्याचे तोंड काळ्या रंगाच्या कपड्याने बाधलेले व गडद मरुम रंगाचा हाफ बाहीचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली तसेच ईतर दोघांनी काळ्या रंगाचे हाफ बाहीचे शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली होती. तिघे अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटाचे तसेच मध्यम सडपातळ शरिरियष्टीचे होते. याबाबत नरेशकुमार नानकानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या