धुळे Dhule। प्रतिनिधी
जिल्ह्यात सरपंचपदाचे (Sarpanch) 12 तर सदस्यपदाचे (membership)सुमारे 400 जागा बिनविरोध (Unopposed) झाल्या आहेत. तर 128 पैकी आठ ग्रामपंचायती (gram panchayats unopposed) बिनविरोध झाल्या आता 120 ग्रामपंचायतींच्या 1212 जागांसाठी (seats) 2362 उमेदवार (candidate) निवडणूक रिंगणात (election arena) आहेत.
जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यात धुळे तालुक्यात 33, साक्री 55, शिंदखेडा 23 व शिरपूर तालुक्यात 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि. 20 डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
धुळे तालुका
तालुक्यात 33 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. माघारीच्या दिवशी चार ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले. तर 82 सदस्य बिनविरोध झाले आहेत. आता 32 ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे 76 तर सदस्यपदासाठी 547 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यातील बेहेड ग्रामपंचायतींने सरपंच पदासह सर्व सातही सदस्य बिनविरोध झाले आहेत. लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान रावसाहेब गिरासे यांना मिळाला आहे. तर सात सदस्य बिनविरोध झाले. त्यात प्रतापसिंग भोजूसिंग गिरासे, नागो त्र्यंबक पाटील, शोभाबाई साहेबराव मोरे, अनिता अर्जुन वाघ, केसरबाई भावसिंग भिल, नवल बाबुलाल कोळी, रुख्माबाई गोपींचद कोळी यांचा समावेश आहे.
VISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज
साक्री तालुका
तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. अर्ज माघारीच्या दिवशी पाच ग्रामपंचायतींची सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर 215 सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यातील भोनगाव, आमोडे, तामसवाडी, होळ्याचापाडा, महुबंद या पाच ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाले आहेत. आता 50 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 179 तर सदस्य पदासाठी 537 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्यास सात वर्षांची शिक्षा
शिंदखेडा तालुका
तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सरपंचपदाचे दोन तर सदस्यपदाचे 43 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. 23 पैकी वणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून आता 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. आता 22 ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी 52 तर सदस्य पदासाठी 369 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर मुख्यमंत्री बोम्मईच्या प्रतिमेला सकल मराठा समाजातर्फे जोडे मारो आंदोलन
शिरपूर तालुका
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. सरपंचपदासाठी 59 तर सदस्यपदासाठी 346 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या नेतृत्वाखाली बोराडी येथील सरपंचासह सर्वच्या सर्व 17 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच करवंद येथे दहा, वरझडी आठ, वाघाडी सहा, थाळनेर तीन, हाडाखेड तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
४९ हजार केळी उत्पादकांना ५४ कोटींची भरपाई मिळणार – डॉ.विवेक सोनवणे VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा