Saturday, May 4, 2024
Homeनगरएमआयआरसीत खडतर प्रशिक्षण पूर्ण करून २४१ जवान देशसेवेत दाखल

एमआयआरसीत खडतर प्रशिक्षण पूर्ण करून २४१ जवान देशसेवेत दाखल

अहमदनगर | Ahmednagar

नगरच्या लष्कराच्या एमआयआरसी (MIRC) येथे २४१ रिक्रुट्स प्रशिक्षणार्थीनी ३६ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज शानदार परेड केल्यानंतर लष्करामध्ये जवान म्हणून दाखल झाले. यावेळी मेजर जनरल पदमसिंग शेखावत (Major General Padamsingh Shekhawat) (सेना मेडल एम.जी ऍडमिन सदर्न कमांड ) यांनी मानवंदना स्वीकारली.

- Advertisement -

याप्रसंगी मेजर जनरल पदमसिंग शेखावत यांनी रिक्रूट पंकज यादव यास जनरल सुंदरजी गोल्ड मेडलने, रिक्रूट दयाराम गुर्जर यास के एल डिसोझा सिल्वर मेडलने तर आशिक राय यास गांगल पंकज जोशी ब्रॉंझ मेडलने गौरविले. प्रशिक्षणार्थी जवानांनी आपापल्या धर्मग्रंथावर हात ठेवून अखंडता, ऐकता व देशसेवेसाठी एकनिष्ठेची शपथ ग्रहण केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या