Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाश्रीलंकेच्या २५ वर्षीय क्रिकेटपटूला अटक

श्रीलंकेच्या २५ वर्षीय क्रिकेटपटूला अटक

कोलंबो –

श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याला रविवारी पोलिसांनी अटक केली. कोलंबोमध्ये त्याच्या कारच्या धडकेत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलीस प्रवक्त्या एसएसपी जालिया सेनारत्ने यांनी मेंडिसच्या अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला.

- Advertisement -

कोलंबो उपनगराच्या पांडुरा भागात पहाटे पाच वाजता ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पांडुरा परिसरातील एक ६४ वर्षीय व्यक्ती दुचाकीवरून जात होता, त्यावेळी कुसल मेंडिसच्या कारची त्यांना धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला. यानंतर थोड्या वेळाने या व्यक्तीचा मृत्यू झाला.

यानंतर कुसलला अटक करण्यात आली असून लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल. मृत व्यक्ती पनादुराच्या गोरकापोला भागातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

२५ वर्षीय कुसल मेंडिसने आतापर्यंत ४४ कसोटी सामने खेळले असून ८५ डावांमध्ये त्याने २९९५ धावा केल्या आहेत. यात त्याने ७ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...