नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला पटियाला हाऊस कोर्टाने १८ दिवसांची कोठडी सुनावली. तहव्वूर राणाला पटियाला हाऊस NIAच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली आणि राणाला १८ दिवसांची कोठडी बजावण्यात आली. राणा १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहील. यादरम्यान, मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट रचण्यासाठी एजन्सी त्याची सविस्तर चौकशी करेल. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि २३८ हून अधिक लोक जखमी झाले होते.
तहव्वूर राणाला गुरुवारी भारतात आणले गेले. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आणि त्याला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
एनआयएने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने पाठवलेल्या ईमेलसह अनेक भक्कम पुरावे सादर केले होते, जे त्याच्या पोलिस कोठडीसाठी पुरसे ठरतात. या भयानक कटाचा उलगडा करण्यासाठी कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे एजन्सीने न्यायालयाला सांगितले. या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांमध्ये राणाच्या भूमिकेचीही चौकशी तपासकर्ते करतील. एनआयएने राणाला पटियाला हाऊस कोर्टातून त्यांच्या मुख्यालयात आणले आहे.
“एनआयएने २० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने चौकशीसाठी १८ दिवसांची कोठडी दिली आहे. न्यायालयाने निर्देश दिले आहेत की त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी आणि पुढील तारखेला हजर होण्यापूर्वी वैद्यकीय चाचण्या केल्या जातील आणि त्या दरम्यानच्या सर्व वैद्यकीय बाबी पूर्ण केल्या जातील. येत्या काळात तहव्वुर राणाला प्रत्यक्षरित्या न्यायालयासमोर हजर केले जाईल.”
२६/११ च्या मुंबई हल्ल्यात १७४ लोक मृत्युमुखी पडले आणि ३०० हून अधिक जण जखमी झाले. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने केला होता. या हल्ल्याचा कट रचण्यात राणाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. २०११ मध्ये त्याला भारतीय न्यायालयाने दोषी ठरवले होते, पण त्यावेळी तो अमेरिकेत होता. २००९ मध्ये त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्याने प्रत्यार्पणाविरुद्ध कायदेशीर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.
तहव्वूर राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत गुरवारी एनआयएच्या विशेष न्यायालयात नेण्यात आले. रात्री उशिरा न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एनआयएच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाशी संबंधित तथ्ये न्यायालयात सादर केली. न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली गेली. यानंतर एनआयएचे वकील दयान कृष्णन यांनी तहव्वूर राणा यांच्याविरुद्धच्या कलमांचा उल्लेख करत, संबंधित उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा