Thursday, April 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजTahawwur Rana : २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा भारतात दाखल; NIA...

Tahawwur Rana : २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा भारतात दाखल; NIA ने घेतले ताब्यात

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai Terrorist Attack) आरोपी तहव्वूर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून (America) राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष पथकाने भारतात आणण्यात आले आहे. एक खास विमान त्याला घेऊन आल्यानंतर दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यानंतर त्याला विमानतळावरुन थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेले गेले. याठिकाणी त्याची चौकशी करून त्याला अटक केली जाणार असून तहव्वुर राणाला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला २००९ साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती. यानंतर भारत सरकार त्याचा ताबा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली होती. यानंतर त्याला आज भारतात आणण्यात आले.

तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष पथकाने अमेरिकेत (America) महत्त्वाची जबाबदारी बजावली आहे. यामध्ये तीन अधिकाऱ्यांचा मोठा वाटा राहिला आहे. या टीममध्ये आशिष बत्रा यांचा समावेश असून ते झारखंड पोलिस कॅडरचे १९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. सध्या एनआयएमध्ये महानिरीक्षक (आयजी) म्हणून ते काम करत आहेत.

तसेच या टीममधील दुसऱ्या महत्त्वाच्या सदस्य जया राय या आहेत. त्या २०११ च्या बॅचच्या झारखंड कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून काम करणाऱ्या जया सध्या एनआयएमध्ये वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळत आहेत. तर तिसरे अधिकारी प्रभात कुमार हे असून ते छत्तीसगड कॅडरचे २०१९ च्या बॅचचे आयपीएस आहेत. एनआयएमध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून कार्यरत असलेल्या प्रभात कुमार यांनी अमेरिकेत टीमसोबत काम केले असून त्यांनी राणाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. ते दिल्ली विमानतळापासून एनआयए मुख्यालयापर्यंतच्या संपूर्ण ऑपरेशनचा समन्वयक देखील आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

१९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वूर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि नंतर १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेला. कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर, तो शिकागो येथे स्थायिक झाला. तिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय चालवत होता. प्रेषित मुहम्मदचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या जिलँड्स-पोस्टेनवरील हल्ल्याच्या प्रयत्नाशीही त्याचा संबंध होता. राणावर १२ गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.

२६/११ हल्ल्यात १६६ जणांचा झाला होता मृत्यू

तहव्वुर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे.२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गटाने मुंबईतील रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्सवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ लोक मारले गेले होते. त्याच प्रकरणात नोव्हेंबर २०१२ मध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.

पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया काय?

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन जारी करत म्हटले की, “तहव्वुर राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे त्याचे कॅनेडियन नागरिकत्व अगदी स्पष्ट आहे,असे म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी; प्रशासनाचे नियोजन कोलमडले

0
सप्तशृंग गड |वार्ताहर | Saptashringad चैत्रोत्सवानिमित्ताने (Chaitra Utsav) सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. काल रात्रीपासूनच सप्तशृंगी गडावर भाविकांचे जथ्थेचे जथ्थे दर्शनासाठी...