Saturday, May 4, 2024
Homeनाशिकसिन्नर तालुक्यात २६ रुग्णांची भर

सिन्नर तालुक्यात २६ रुग्णांची भर

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्यात काल (दि.१७ ) २६ नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यातील १४ रुग्ण सिन्नर शहरातील असून ग्रामीण भागात नवीन १२ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे काल पर्यंत ३३४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सिन्नर शहरात शिवाजीनगर येथील ६५ वर्षीय पुरुष, विजय नगरमधील 60 वर्षीय महिला, कानडी मळ्यातील २३ वर्षीय व १९ वर्षीय युवक, नवनाथनगर येथील २२ वर्षीय युवक, गंगोत्रीनगर येथे ३२ वर्षीय युवक, विठ्ठलेश्वर मंदिराजवळील २१ वर्षीय युवकाचा त्यात समावेश आहे.

उज्वलनगरमध्ये नवे सात रुग्ण आढळले आहेत. त्यात दोन, सहा, आठ, बारा व १४ वर्षीय मुली, ३६ व ४२ वर्षीय महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे नवे चार रुग्ण सापडले आहेत. त्यात पंधरा वर्षीय मुलगा, ४० वर्षीय महिला, चाळीस व ४८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. कणकोरी येथे पुन्हा दोन रुग्ण सापडले असून त्यात १६ वर्षीय मुलगा व १८ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

तालुक्यातील वारेगाव येथे २५ वर्षीय युवक, लोणारवाडी येथे २६ वर्षीय युवक तर निर्‍हाळे येथे ३२ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथे ३२ वर्षीय युवक, दोडी बुद्रुक येथे १९ वर्षीय युवक व ३६ वर्षीय महिला करोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या