Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : तरुणाचा गळा आवळून खून

Nashik Crime News : तरुणाचा गळा आवळून खून

ओझर | प्रतिनिधी Ozar

- Advertisement -

ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मयत तरुणाचे नाव विनोद विष्णू शेंद्रे (वय ३४) असून तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून ओझर येथे एका किराणा दुकानात काम करत होता. तो कमोद फोटो स्टुडिओसमोर असलेल्या घरात एका मित्रासह भाड्याने राहत होता. आज सकाळी त्याचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला.

मयताच्या मानेवर गळा आवळल्याच्या स्पष्ट खुणा दिसून आल्याने हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश कुलकर्णी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत...

0
मुंबई | Mumbaiराज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष...