Friday, May 16, 2025
Homeधुळेधुळ्यात 27 लाखांची लूट

धुळ्यात 27 लाखांची लूट

धुळे । Dhule

- Advertisement -

शहरातील निरामय हॉस्पिटल (Niramay Hospital) मागील बाजूने भरवस्तीत चौघा लुटारुंनी (four robbers) दुचाकीस्वाराच्या (biker) डोळ्यात मिरची पूड (Throwing chili powder in the eyes) फेकून मोठी लूट (big booty) केल्याने खळबळ उडाली आहे. साधारणत: 25 ते 27 लाखांची (27 lakhs in cash) रोकड लांबविल्याची माहिती समोर येत असून पोलीस प्रशासनाने (police administration) नाकाबंदी करीत शोध सुरु केला.

जळगावच्या महापालिका आयुक्तांच्या कामकाजाचे लेखा परिक्षण व्हावे

शहरातील खड्डाजीन घड्याळ फॅक्टरी परिसरातील माधव कॉलनी प्लॉट नंबर 13 मध्ये राहणारे परेश पटेल (वय 35) हे व्यापारी आज दि.12 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कपाशीचे मिळालेले पेमेंट घेऊन घरी दुचाकी क्रमांक एम.एच.18-6503ने घरी जात असतांना घराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चार व्यक्तींनी परेश पटेल यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्याशी धक्काबुक्की करीत त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन पोबारा केला.

एकनाथराव खडसे म्हणतात : सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जिल्हयातील नंदुरबार व धडगाव येथील महिला रुग्णालय कागदावरच

परेश पटेल यांच्या दुचाकीच्या डिक्कीत 25 ते 27 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपाधीक्षक एस.ऋषिकेश रेड्डी, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे शाखेचे कर्मचारी शोधपथकातील कर्मचारी यांनी घटनास्थळी गाव घेतली.

गृहसचिवांसह तपासधिकार्‍यांना बजावली नोटीस

घटनास्थळावरुन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून शहरात 12 पत्थर गांधी पुतळा चहुबाजूने नाकाबंदी केली आहे. पोलीस लुटारुंचा शोध घेत असून लवकरच त्यांना ताब्यात देण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दोन अल्पवयीन बहिणीना कारमधून पळवून नेले

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वादळी पावसात पत्र्याचे शेड कोसळले; एक जण जखमी

0
  येवला| प्रतिनिधी Yeola शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड...