Tuesday, October 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा, मुख्यमंत्री नाशिकला येतील आणि रस्त्यावरील खड्डे बुजवले...

दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा, मुख्यमंत्री नाशिकला येतील आणि रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील – मंत्री छगन भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीने नाशिकला आले म्हणून शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले, अशी मिश्किल टोलेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

नाशिकच्या रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच हा मुद्दा थेट जाहीर कार्यक्रमातून मांडला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री मोटारीने आले म्हणून नाशकातले सगळे खड्डे बुजवले गेले. त्यामुळे दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा. म्हणजे मुख्यमंत्री मोटारीने नाशिकला येतील आणि सगळे खड्डे बुजवले जातील. या विधानातून त्यांनी शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानताना भुजबळ यांनी मुंबईहून नाशिकला येताना रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे नेहमीपेक्षा लवकर नाशिकला पोहोचता आल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, समृद्धी महामार्ग चांगला असला तरी भिवंडी बायपास परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दोन ते तीन तासांचा वेळ लागत असल्याची बाबही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

आमच्या व्यथा पाहण्यासाठी रस्त्याने आलात
आमच्या व्यथा पाहण्यासाठी तुम्ही रस्त्याने नाशिकला आलात, त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार, असे म्हणत भुजबळ यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी केली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती होत असेल तर असे दौरे वारंवार व्हावेत, असा अप्रत्यक्ष संदेशच त्यांनी या वक्तव्यातून दिला.

खड्ड्यांचा प्रश्न नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा
नाशिक शहर आणि परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गेल्या काही काळापासून गंभीर बनला आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत भुजबळ यांनी थेट पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोरच खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला.

नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा झालेला हा प्रश्न भुजबळ यांनी जाहीर कार्यक्रमातून मांडल्याने उपस्थितांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमात विकासकामांसोबतच नाशिकच्या रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही चांगलाच चर्चेत आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; ‘मनोमिलन’ की ‘सीमोल्लंघन’?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे नेते राम शिंदे यांनी पुन्हा एकदा...