नंदुरबार nandurbar। प्रतिनिधी
नाशिक व विसरवाडी येथे स्वस्तात घर व जमीन (cheap house and land) मिळवून देण्याचे आमिष (lure) देवून रोख रक्कम तसेच कोर्या चेकवर स्वाक्षर्या करून ते वटवत 27 लाख 88 हजार 500 रूपयांची फसवणूक (fraud) केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील भरडु येथे राहणार्या कोलुबाई वळवी यांच्यासह त्यांचे मेव्हणे व बहिणीला स्वस्तात घर व जमीन घेवून देतो असे आमिष दाखवत धेडग्या गावीत याने रोख रक्कम व कोरे चेक घेतले. धेडग्या गावीत याने त्याच्या विसवाडी येथील स्टेट बँकेच्या खात्यात सदर चेक वटवून घेतले. कोलुबाई वळवी यांच्यासह त्यांचे मेव्हणे व बहिणीची फसवणूक केली म्हणुन कोलुबाई कातुड्या वळवी यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात धेडग्या होजी गावीत रा.हळदाणी ता.नवापूर याच्याविरूध्द भादवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नितीन पाटील करीत आहेत.