धुळे – Dhule :
जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 28 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यात एका धुळे शहर पोलिस कर्मचार्यांसह शहरातील इतर 9, शिरपूर 7 व दोंडाईचा व शिंदखेड्यातील 7 जणांचा समावेश आहे. तर सकाळी धुळे शहरातील अग्रवाल नगरातील 86 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू होते. दरम्यान जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 1 हजार 623 झाली आहे. तर आतापर्यंत एकुण 77 जणांचा मृत्यू झाला आहे.
दुपारी साडेतीन वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 47 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात वाघाडी 1, थाळनेर 1, आमोदे 1, वरवाडे 1, शिरपूर शहरातील एका रूग्णांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयातील 41 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात स्नेहप्रभा कॉलनी, धुळे 2, वृंदावन कॉलनी धुळे 1, शिरूड (ता. धुळेे) 1, प्रा.आ.केंद्र कापडण्यातील एक रूग्ण आहे. दुपारी 4.15 वाजता शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 33 अहवालांपैकी बोराडी ता. शिरपूर येथील 42 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 15 अहवालांपैकी विद्यानगर, दोंडाईचा येथील 56 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्अ आला आहे. दुपारी 6.30 वाजता दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 40 अहवालांपैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात रावळ नगर 1, डाबरी घरकुल 1, रंझाणे 1, नरडाणा 2, औदुंबर कॉलनी, दोंडाईचातील एका रूग्णाचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयातील 44 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. धुळे शहरातील गल्ली नंबर 7 मधील 1 व लामकानी (ता. धुळे) येथील एका रूग्णाचा समावेश आहे.
तसेच रात्री 8 वाजता जिल्हा रुग्णालय 2 अहवालांपैकी एका धुळे शहर पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातील 43 अहवालांपैकी 6 अहवाल धुळे जिल्ह्यातील व 1 अहवाल धरणगाव (जि. जळगाव) येथील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात कल्याणी नगर 1, चाळीसगाव रोड 1, इतर धुळे 2, नंदाणे (ता. धुळे) 1 व शिरपूरातील एका रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या 1 हजार 623 झाली आहे.