Friday, May 24, 2024
Homeनाशिकशहरात 29, ग्रामीण भागात 25 नवे करोनाबाधित

शहरात 29, ग्रामीण भागात 25 नवे करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात 67 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत…

- Advertisement -

तर मागील चोवीस तासात 75 रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 67 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील (Nashik City) संख्या 29 इतकी आहे.

आज ग्रामिण भागात (Nashik Rural) 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात (Malogoan) १ रूग्ण आढळला. तर जिल्हाबाह्य 12 रुग्णांची नोंद झाली आहे .

आज जिल्ह्यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील 1 रूग्ण, तर शहरातील 1 रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्यूचा आकडा 8 हजार 551 इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या