Friday, May 31, 2024
Homeमहाराष्ट्रBus Accident News : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी...

Bus Accident News : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २९ प्रवाशांसह खासगी बस पूलावरून कोसळली

जालना | Jalna

गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या (Accident) संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत असून त्यात रस्ते अपघाताच्या घटना अधिक प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar-Jalna Highway) काल (सोमवारी) मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी (Private bus) बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट पूलावरून खाली कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे…

- Advertisement -

Accident News: स्कुल बस – रिक्षाचा भीषण अपघात; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवार (दि.२५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही खाजगी बस पुण्याहून नागपूरच्या (Pune to Nagpur) दिशेने निघाली होती. त्यावेळी ही बस बदनापूर येथे आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलावरून (Bridge) खाली कोसळली. या अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर व जालना पोलिसांनी (Badnapur and Jalna Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातग्रस्त बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या