Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारअक्कलकुवा ग्रामपंचायतीत 3 कोटी 35 लाख रुपयांची अनियमता

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत 3 कोटी 35 लाख रुपयांची अनियमता

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी-

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत (Akkalkuwa Gram Panchayat) सन 2016 ते 2020 या कालावधीत 3 कोटी 34 लाख 79 हजार रुपयांची अनियमतता (rregularity) असल्याचे लेखा परिक्षण अहवालात (audit report) निष्पन्न झाले आहे. यापैकी 10 लाख 87 हजार 775 रुपये एवढी रक्कम संबंधीत दोषींकडून वसुल पात्र ठरविण्यात आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अक्कलकुवा ग्रामपंचायतीवर प्रशासक असलेल्या पंचायत समितीच्या तत्कालीन कृषि अधिकारी, तत्कालीन विस्तार अधिकारी, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, तत्कालीन सरपंच, ग्रामाकोष समितीचे अक्कलकुवा, मिठयाफळी, मक्राणीफळी येथील संबंधीत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, समिती अध्यक्षांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतीत सुमारे पावणे चार कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत गेल्या चार वर्षापासून चौकशी करण्यात येत होती. संबंधीत प्रशासक, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांना याप्रकरणी लेखी देवून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीचे दप्तरही गहाळ करण्यात आले होते. त्यानंतर सन 2016-17, 2017-18, 2018-2019 या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण करण्यात आले.

त्यानुसार लेखा अहवाल हे सरपंचांना देण्यात आले होते. लेखा परिक्षण अहवालात लेखा परिक्षकाने नोंदविलेल्या आक्षेपाधीन, वसुल करणे, वर्ग करणे, व इतर सर्व मुद्दयांची अनुपालन चार महिन्यांच्या आंत ग्रामपंचातीच्या ठरावांच्या प्रतीसही तालुक्यातील ग्रामपंचायतीने करणे अपेक्षीत होते. मात्र, आजपर्यंत पुर्तता अहवाल प्राप्त झाला नाही. अहवाल प्राप्त होऊन 1 वर्ष 8 महिने कालावधी झालेला असून संबंधीत सरपंच/उपसरपंच/प्रशासक/ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांनी पुर्ततेसंबंधी करावयाची कार्यवाही ही जाणुनबुजून प्रलंबीत ठेवली. त्याअनुषंगाने या कार्यालयाने लेखा परिक्षण करण्यातत आलेल्या अहवालानुसार संबंधीत दोषींवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

सन 2016-17, 2017-18, 2019-20 अन्वये लेखा परिक्षणामध्ये आक्षेपाधीन ठेवलेली एकुण रक्कम 3 कोटी 34 लाख 79 हजार 493 रुपये एवढी आहे. सदर रक्कम ही अनियमितता घोषीत करुन त्यास लेखा परिक्षणात नमुद केल्याप्रमाणे त्या त्या कालावधीचे सरपंच, प्रशासक, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्याप्रमाणे सन 2016-17, 2017-18, 2019-20 अन्वये लेखा परिक्षणामध्ये वसुल पात्र रक्कम 10 लाख 87 हजार 775 रुपये एवढी आहे.

सदर अनियमिततेबाबत संबंधीत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही.बी.जाधव, तत्कालीन प्रशासक एम.आर.देव, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आनंदा ओजना पाडवी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच तत्कालीन सरपंच श्रीमती राजेश्वरी इंद्रवर्धन वळवी, उपसरपंच ताजमहमंद अल्लारखा मक्राणी यांच्याविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार सादर करण्यात आला होता परंतु सरपंच व उपसरपंच पदाचा कालावधी संपल्याने निर्णय होऊ शकला नाही.

दि.1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017, 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018, 1 एप्रिल 2018 ते 2019 या कालावधीतील लेखा परिक्षणासनुसार व चौकशी अहवालानुसार काढण्यात आलेल्या अनियमितता रक्कमेसंबंधी दोषी असलेल्या, तत्कालीन प्रशासक तथा अक्कलीकुवा पं.स.कृषी अधिकारी जे.एस.बोराळे, तत्कालीन प्रशासक तथा तत्कालीन विस्तार अधिकारी एम.आर.देव, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही.बी.जाधव, तत्कालीन सरपंच श्रीमती उषाबाई प्रविण बोरा, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आनंदा ओजना पाडवी, तसेच 5 टक्के पेसा अंबंध निधी अंतर्गत, अक्कलकुवा, मक्राणीफळी, मिठयाफळी येथील ग्रामाकोष समितीचे सबंधीत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, समिती अध्यक्ष व सदस्य यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या