Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedनवनाथांच्या तीर्थक्षेत्रांना पावणेतीन कोटींचा निधी

नवनाथांच्या तीर्थक्षेत्रांना पावणेतीन कोटींचा निधी

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

राज्यातील नवनाथांपैकी आठ नाथ तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार आहे. त्याठिकाणी पायाभूत सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र अन्‌ पर्यटनस्थळ (tourist spot) विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) ५ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिलो. त्यापैकी २ कोटी ७५ लाख रुपये पर्यटन व सांस्कृतिक विभागाने वितरित केले आहेत.

- Advertisement -

गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

गोरक्षनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ क्षेत्रांना प्रत्येकी ५० लाख, तर मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, नागनाथ, जालिंदरनाथ, भर्तरीनाथ क्षेत्रांना प्रत्येकी २५ लाख रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे ज्योतिर्लिंग, अष्टविनायक यात्रा, बौद्ध सर्किट या यात्रांत्रमाणे आता नवनाथांची यात्रा हे पर्यटनाचे नवीन दालन खुले होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्याला होणार आहे.

गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत पायाभूत सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार आहे. यात राज्यातील नवनाथांपैकी आठ नाथ तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान (मांजरसुंबा) येथे सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अंदाजित १ कोटी रुपयांना मान्यता दिली असून, यातील ५० लाख वितरित केले आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी (कानिफनाथ गड) येथे सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी अंदाजित १ कोटी रुपये, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटेगावातील चमस नारायण रेवनाथ क्षेत्र येथ मूलभूत सोयी-सुविधांसाठी सुमारे १ कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. त्यापैकी निम्मी रक्‍कम वितरित करण्यात आली.

पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचेगुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

- Advertisment -

ताज्या बातम्या