Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशजवानांच्या ताफ्यावर माओवाद्यांचा भ्याड हल्ला, ३ जवान शहीद

जवानांच्या ताफ्यावर माओवाद्यांचा भ्याड हल्ला, ३ जवान शहीद

सुकमा | Sukma

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी दोन जवानांची हत्या केल्याची घटना ताजी असताना आता छत्तीसगडमध्ये भ्याड हल्ला केला आहे. जवानांवर माओवाद्यांनी हल्ला केला असून 3 जवान शहीद झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कुंदेडजवळ ही घटना घडली. सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एएसआय रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा आणि हवालदार वंजाम भीमा अशी शहीद झालेल्या पोलीस अधिकांऱ्यांची नावे आहेत.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, अनेक विद्यार्थ्यी जखमीपिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

सर्व पोलीस गस्तीसाठी जात होते. त्यावेळी सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. यात तीन डीआरजी अधिकारी शहीद झाले असून, दोन जवान जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते .गोंदिया जिल्ह्याच्या सीमेपासून सहाशे मीटर अंतरावर छत्तीसगडच्या राजनांदगांव जिल्हयाच्या हद्दीत माओवाद्यानी नाकाबंदीत असलेल्या दोन पोलिसांना गोळ्या घालून ठार केले.

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यु

घटनास्थळ बोरतलाब ता.पु. जि. राजनाडगाव, छत्तीसगडच्या नाक्यावर हल्ल्यात CG पोलिसांचे 02 पोलीस जवान शहीद झाले. राजेश सिंग (हेड कॉन्स्टेबल), ललित यादव (कॉन्स्टेबल) अशी शहीद झालेल्या जवानांची नाव आहे. जवानांची हत्या केल्यानंतर माओवाद्यांनी त्याच्या मोटरसायकलीही जाळल्या होत्या.

धक्कादायक! शिळे अन्न खायला घातल्याने ५० गायींचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या