Friday, November 22, 2024
Homeदेश विदेशHelicopter Crash: बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले; दोन पायलटसह तीन जण...

Helicopter Crash: बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले; दोन पायलटसह तीन जण बेपत्ता

पोरबंदर | Porbandar

भारतीय तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. गुजरातमधील पोरबंदरजवळ अरबी समुद्रात बचावासाठी गेलेलं हलिकॉप्टर कोसळलं आहे. या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट व एक डायव्हर बेपत्ता आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरातमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे.

भारतीय तटरक्षक दलाचेही एक हेलिकॉप्टर गुजरातमध्ये पूर मदत कार्यात गुंतले होते, परंतु काल रात्री पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राजवळ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटला हेलिकॉप्टर पाण्यात उतरवावे लागले.

हे ही वाचा : अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ करण्यास रेल्वेचा ‘ग्रीन सिग्नल’

लँडिंगच्या वेळी जोरात ते पाण्यात पडले, त्यामुळे हेलिकॉप्टरमधील चारही जण बुडाले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण चार जण होते ज्यामधील दोन्ही पायलट व एक डायव्हर बेपत्ता आहे. तर एका डायव्हरला बचाव पथकाने वाचवलं आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. वैमानिकाने आपत्कालीन संदेश पाठवला असल्याने त्यांच्या मदतीसाठी नौदलाची चार जहाजे आणि दोन विमाने तैनात करण्यात आली आहेत.

हे ही वाचा :  एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? सरकारने बोलावली तातडीची बैठक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या