Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्या3 हजार एकर जागा रिकामी, तेथे उद्योग आणा राज ठाकरे यांचा निरोप

3 हजार एकर जागा रिकामी, तेथे उद्योग आणा राज ठाकरे यांचा निरोप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिकच्या इंडस्ट्रियल एरिया (Industrial Area) मध्ये सुमारे तीन हजार एकर जमीन ही रिकामी पडून आहे. हजारो उद्योग बंद पडलेले आहेत, त्यांना पुन्हा सुरु करण्यासाठी तसेच

रिकाम्या जागी नव्याने उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना त्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करून पांजरपोळची शेकडो एकर जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पांजरपोळच्या जागेवर एमआयडीसी (MIDC) झाल्यास पर्यावरणाला (environment) मोठा धोका निर्माण होणार आहे, कारण त्या जागी लाखो वृक्ष आहे. त्यांची कत्तल झाल्यास त्याच्या परिणाम अवघ्या नाशिकवर होणार आहे.

त्यामुळे आमचा पांजरपोळच्या ठिकाणी एमआयडीसी (MIDC) करण्यास विरोध आहे. अशी माहिती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने पत्रकार परिषद घेऊन देण्यात आले. वेळप्रसंगी आंदोलन (agitation) देखील करण्याचा इशारा देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमींनी मुंबईत राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली होती.

ठाकरे यांनी त्वरित नाशिक मधील पदाधिकाऱ्यांना तिकडे बोलावून अधिक माहिती घेत पांजरपोळ जागेवर एमआयडीसी करण्यास विरोध करण्याचे सांगितले होते. पांजरपोळ येथील वनसंपदा ही खऱ्या अर्थाने निसर्गाची मिळालेली देन आहे. मात्र ही वनसंपदा नष्ट करुन विकास करणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही. उद्योगासाठी पांजरपोळ येथील सुमारे तीन लाख झाडे तोडून विकास करणे हे नाशिककरांना चालणारे नाही.

शासनाने पांजरपोळचा नाद सोडून जे उद्योग बंद पडले आहेत. त्यासाठी समिती नेमून ते पूर्नजिवीत करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) केली. यावेळी शहराध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप दातीर, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सलीम शेख, माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष प्रराग शिंत्रे, मनोज घोडके, संदीप भवर आदी मान्यवर उपस्थित होते.

शहराध्यक्ष दातीर म्हणाले, आमचा विकासाला आणि आधुनिकतेला विरोध नाही. मात्र ज्या सातपूर (satpur), अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) मोठया प्रमाणात भूखंड पडलेले आहे. विशेष म्हणजे पांजरपोळ भागात असलेली लाखो झाडे सातपूर व अंबड परिसरात जे प्रदुषण (Pollution) वातावरण दुषीत होते. ते प्रदुषण शोषीत करण्याचे काम हीच झाडे करतात. विकास झाला पाहिजे, मात्र निसर्गाचा ऱ्हास करुन कामे नको. यापूर्वी दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) अक्राळे येथे सात आठ वर्षापूर्वी उद्योगासाठी जागा अधिग्रहीत केली आहे. मात्र अद्याप तेथे कोणताही उद्योग आलेला नाही.

सातपूर व अंबड परिसरात अनेक बिल्डरांनी कमी दरात जागा घेउन त्याच चढ्या दराने विकल्या जात आहेत. तसेच शहरातील जे उद्योग बंद पडले आहे. त्यांचे पुर्नजिवन करण्याचे काम सोडून पांजरपोळ येथे वनसंपदा नष्ट करण्याचा हेतू निसर्गाला घातक आहे. कोणीतरी सांगते म्हणून म्हणून भूखंड मिळ्वायचे हे धोरण चूकीचे आहे. पांजरपोळ मध्ये झाडे तोडून ती जागा उद्योगाला देणे हे नाशिककर खपवून घेणार नाही.

माजी नगरसेवक सलीम शेख म्हणाले, शहरात उद्योगासाठी अनेक जागा आहेत. बेळ्गांव ढगा येथे साडे तीनशे एकरपेक्षा पडीत जमीनी आहेत. तेथे झाडे दीखील नाही. ती जागा शासनाने उद्योगासाठी संपादीत करावी. पांजरपोळ येथील वनसंपदा वाचली पाहिजे. तसेच शहरात अनेक जागा पडून आहेत. त्याचा उपयोग होत नसताना. जेथे खऱ्या अर्थाने जैवविविधता आहे.

ते चक्र मोडण्याचे काम करु नये. माजी महापौर अशोक मुर्तडक म्हणाले, पर्यावणाची हानी व्हायला नको, पांजरपोळ परिसरात साडे तीनशे हून अधिक विविध जाती प्रजातीच्या वनस्पती आहेत. अनेक पशु पक्षी व इतर वन्यजिव या परिसरात आहेत. उद्योगासाठी येथील जागा देणे म्हणजे वन्यजिव, झाडे व पशु-पक्षांचा अधिवास नष्ट करणे असाच होय. त्यामुळे शासनाने येथील जागेचा विचार सोडून द्यावा.

मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांशी चर्चा

वनसंपदा नष्ट करुन उद्योग उभारणे कितपत योग्य आहे. यास मनसेनेकडून विरोध केल्यानंतर याप्रकरणी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याशी चर्च करणार असल्याचे दातीर यांनी सांगितले. पांजरपोळ म्हणजे नाशिकचा ऑक्सिजन असल्याने पर्यावरणाला हात न घालता विकास व्हावा, अशी आमची भूमिका असल्याचे सलीम शेख यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या