Saturday, May 4, 2024
Homeनगरऐन करोनात झेडपीला 30 कोटींची लॉटरी

ऐन करोनात झेडपीला 30 कोटींची लॉटरी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्हा परिषदेच्या सेस फंडात शिल्लक असणार्‍या विविध हेडचा निधी, ग्रामपंचायतींचे अनुदान आणि ठेकेदारांची अनामत रक्कमेतील शिल्लक रक्कम असे

- Advertisement -

साधारण 30 कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या सेस फंडात शिल्लक आहे. या निधीतून जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी 70 टक्क्यांपर्यंत विकास कामे करण्याचा मानस गुरूवारी झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील शिल्लक रक्कमेचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या लालटाकी येथील शासकीय बंगल्यावर अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे, समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषेच्या सेस फंडात ग्रामपंचायतींचे 50 टक्के अनुदानापोटीचे सुमार 7 ते 8 कोटी, कामे पूर्ण होवून ऑडिट झालेल्या कामांपैकी ठेकेदार यांचे 5 टक्के किंवा त्यापेक्षा अधिकची अनामत रक्कमेपोटी 8 कोटींच्याजवळपास रक्कम, न वटलेल्या धनादेशाचे 3 ते 4 कोटी यासह अन्य रक्कम अशी सुमारे 30 कोटींचा निधी जिल्हा परिषद सेस फंडात शिल्लक आहे. या निधीचा जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी आढावा घेतला. यातील बहुतांशी निधी खर्च करण्याचा मानस पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे. यासाठी जिल्हा परिषद विभागनिहाय खातेप्रमुखांची पदाधिकार्‍यांनी बैठक घेतली.

कोविड काळात जिल्हा परिषदेच्या निधीला कात्री लागली असून या काळात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील रक्कम पदाधिकारी आणि सदस्यांना लॉटरी सारखी ठरणार आहे. सेस फंडातील एकूण निधीपैकी जवळपास 70 टक्के निधी खर्च करण्याचा मानस यावेळी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंघाने खातेप्रमुखांना सुचनाही देण्यात आल्याचे अर्थ विभागातून सांगण्यात आले.

……………….

आढावा बैठकीला सत्ताधारी गट नेत्यांना टाळले

गुरूवारी जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून सेस फंडाच्या नियोजनासाठी आणि आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटाच्या प्रतोद यांना निरोप देण्यात आला नाही. बैठक झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे प्रतोत (गट नेते) यांनी स्वत:हून या बैठकीची माहिती घेत झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या