Friday, September 20, 2024
Homeनाशिकमुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात आरोग्य, रोजगार माहितीचे ३० स्टॉल

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात आरोग्य, रोजगार माहितीचे ३० स्टॉल

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित शिबिरामध्ये तीस स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक माहिती तसेच उमेद अंतर्गत महिलांना रोजगार मिळावा यासाठी विविध खाद्यपदार्थांचे वस्तूंचे आणि महिलांविषयी माहिती देण्यात येत होती.

उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पूरक आहार प्रदर्शन, आरोग्य बाबत विविध योजनांची प्रसिद्धी, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सिकलसेल तपासणी, आपत्कालीन सेवा, नोंदणी व औषध वितरण विभाग , एकात्मिक बालविकास विभाग सेवा योजना विभाग, संजय गांधी योजना, महिला बालविकास विभाग, महाज्योती, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, समाज कल्याण, महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी स्टॉल उभारण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या