Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमनपाकडून ३० हजार लिटरची ऑक्सिजन टाकी

मनपाकडून ३० हजार लिटरची ऑक्सिजन टाकी

नाशिक | प्रतिनिधी

कराेनाच्या पार्श्वभूमीवर बाधितांना आॅक्सिजनची नितांत गरज भासत आहे.

- Advertisement -

आॅक्सिजनअभावी कुणाचा जीव जावू नये, यासाठी महानगरपालिकेच्या बिटकाे रूग्णालयात २० हजार तर डाॅ. झाकिर हुसैन रूग्णालयांत १० हजार लिटर क्षमतेची आॅक्सिजन टाकी बसविली जात आहे.

नाशिक महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती गणेश गीते व अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने पार पडली, त्यावेळी गीते यांनी हा निर्णय जाहीर केला.

सभेत विविध विषयांवर स्थायी समिती सदस्यांनी मुद्दे मांडले. यावेळी सभापती गणेश गीते यांनी सांगितले की, करोनासाठी मानधनावर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन पीएफ नंबर घेऊन त्वरित अदा करण्यात यावे तसेच कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी यांच्याबाबतचा सविस्तर अहवाल पुढच्या स्थायी समिती सभेत सादर करावा.

त्याबाबतचा निर्णय तेव्हा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर, ऑक्सिजन टाकी बसवण्याचे काम सुरू असून लवकरात लवकर मनपाच्या वतीने ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू करण्यात येणार आहे.

यासह शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. महिला व बालकल्याण विभागाच्या प्रशिक्षणाबाबतच्या विषयाचे डॉकेट पुढील स्थायी समितीवर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या बैठकीस स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर, अशोक मुर्तडक, राहुल दिवे, सत्यभामा गाडेकर, कमलेश बोडके, कल्पना पांडे, समीना मेमन, सुनीता कोठुळे, स्वाती भामरे, राकेश दोंदे, प्रा शरद मोरे, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी, रुपाली निकुळे आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटीचे काम थंड

शहरात स्मार्ट सिटीचे काम संथ गतीने सुरू असून याबाबतची सविस्तर माहिती येत्या महासभेत स्मार्ट सिटीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार असल्याचे सभापती गणेश गीते यांनी सांगितले.

तरच आॅडिटर नेमा

ज्या हॉस्पिटलमध्ये कराेना रुग्ण उपचारासाठी दाखल असतील, त्याच हॉस्पिटलमध्ये ऑडिटर नेमण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. तसेच कराेना रुग्णांवर केले जात असलेले उपचार व नियोजन याची सविस्तर माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या