Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोदावरी नदीला पूर; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

गोदावरी नदीला पूर; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. पुराच्या पाण्याने ऐतिहासिक दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत मजल मारली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून त्याचा परिणाम गोदावरीच्या प्रवाहावर झाला आहे. नदी काठावरील दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने घाटावरील अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने घाटापासून दूर रस्त्याच्या कडेला हलवली आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे रामकुंड परिसरात दशक्रिया, अस्थी विसर्जन व अन्य धार्मिक विधी घाटावर न करता सुरक्षित ठिकाणी अथवा घाटाच्या कडेला पार पाडले जात आहेत. रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी अधिक वेगाने वाढत असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास रामकुंड परिसरातील दुकाने आणि नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाचा इशारा
पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून हवामान विभागाने पुढील काही काळ जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदीपात्र व पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...