Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMalegaon : ३ हजार २७३ बनावट जन्मदाखले मनपा प्रशासना तर्फे रद्द

Malegaon : ३ हजार २७३ बनावट जन्मदाखले मनपा प्रशासना तर्फे रद्द

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

बनावट कागदपत्रे सादर करीत महानगरपालिकेतून घेण्यात आलेली 3 हजार 273 जन्म दाखले रद्द करण्याची कारवाई अखेर मनपा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे तसेच बनावट कागदपत्रांद्वारे जन्मदाखले घेणाऱ्या एक हजार लाभार्थीविरुद्ध देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे अशी माहिती भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

मालेगाव येथे रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रे सादर करीत जन्म दाखले प्राप्त केले आहे काहींनी पासपोर्ट काढून विदेशात देखील पलायन केले आहे असा आरोप भाजप नेते खासदार डॉ किरीट सोमय्या यांनी करत चौकशीची मागणी केल्याने राज्य शासनातर्फे विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले घेतल्याप्रकरणी येथील किल्ला व छावणी पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे नोंदविण्यात आले होते याप्रकरणी नायब तहसीलदार यांच्यासह अनेक जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे पोलिसां तर्फे दाखल गुन्ह्यात 539 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले होते

दरम्यान तहसीलदारांचा बनावट सही शिक्का तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिकेतून मोठ्या प्रमाणात जन्म दाखले घेण्यात आले होते 2024 मध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला होता यासंदर्भात मनपा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किल्ला पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता या संदर्भात काही दिवसापूर्वी मालेगावी सोमय्या यांनी भेट देत हे जन्मदाखले रद्द करण्याची मागणी केली होती

या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने 3 हजार २७३ जन्म दाखले रद्द करण्याची कारवाई केली आहे लवकरच एक हजार जन्म दाखले बनावट कागदपत्रांच्या आधारे घेणाऱ्या लाभार्थी विरुद्ध देखील फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...