धुळे । dhule । प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील सोनगीर येथील शाळेत (school) नोकरीची बनावट (Fake jobs) ऑर्डरी देवून ( Fake placing an order)उमेदवारांची (candidates) तब्बल 33 लाखात फसवणूक (Fraudकेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोनगीर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सत्यनारायण पांडुरंग शिंपी (वय 48 रा. तुळजाभवानी इलेक्ट्रीक, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, शिंदखेडा यांनी सोनगीर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सन 2008 ते 2017 दरम्यान हा प्रकार घडला. सुनिल उर्फ भेरूलाल हिरालाल बागुल (वय 60 रा. बागुल गल्ली, सोनगीर) यांनी फिर्यादी यांचा भाऊ हनुमत शिंपी व बहिणी सुवर्णलता शिंपी यांना व साक्षीदार व त्यांचे नातेवाईकांना सोनगीर येथील एन.जी.बागुल शाळत क्लार्क व लॅब असिस्टंट, उपशिक्षक अशा वेगवेगळ्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी सन 2009 मध्ये साडेचार लाख रूपये रोखीने घेतले. तसेच साक्षीदारांकडून देखील लाखो रूपये रोखीने घेवून खोट्या व बनावट नोकरीच्या ऑर्डरी देवून कोणालाही नोकरीला न लावता एकुण 33 लाख 50 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली. म्हणून सुनिल बागुल याच्याविरोधात भादंवि कलम 420, 465, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई रविंद्र महाले हे करीत आहेत.