Saturday, November 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूज३५ ट्रॉली चारा जळून खाक; आगीवर नियंत्रण मिळवतांना एक जण गंभीर जखमी

३५ ट्रॉली चारा जळून खाक; आगीवर नियंत्रण मिळवतांना एक जण गंभीर जखमी

शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

तालुक्यातील दोन गावांमध्ये चाऱ्याला अचानक आग लागून सुमारे ३५ ट्रॉली चारा जळून खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आगीच्या या दोन घटनांमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिली घटना कुसूर येथे गुरुवारी, (दि. १२) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. येथील शेतकरी दौलत गायकवाड यांनी आपल्या जनावरांसाठी मका व बाजरीचा सुमारे सुमारे २५ ट्रॉली चारा विकत घेऊन साठवून ठेवला होता. मात्र, अचानक शॉर्टसर्किटमुळे या चाऱ्याला आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण चारा जळून भस्मसात झाला. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून साठवलेला चारा डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने गायकवाड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, युवा नेते संभाजी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

दुसरी घटना गुरुवारी, (दि. १२) रात्री ८ वाजेच्या सुमारास आडसुरेगाव येथे घडली. येथील शेतकरी सुनील पोपटराव चव्हाण यांचा सुमारे १० ट्रॉली मका चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. चाऱ्याला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला. या वेळी आग विझविण्याचा प्रयत्न करताना किशोर चव्हाण हे गंभीररीत्या जखमी झाले.

या दोन्ही घटनांमध्ये एकूण सुमारे ३५ ट्रॉली चारा जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना जनावरांसाठी साठवलेला चारा आगीत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. शासनाने बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : उमराण्यात दुकानात धाडसी चोरी; नागरिकांच्या मदतीने दोघे ताब्यात

0
उमराणे | वार्ताहर | Umarane येथील मुख्य रस्त्यावरील (Road) एका दुकानात रात्री दहा वाजता धाडसी चोरी झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. कटर आणि ग्राइंडरच्या...