Friday, September 20, 2024
HomeनगरAssembly Election : जिल्ह्यात विधानसभेसाठी ३७ लाखांवर मतदार, महिला मतदारांची संख्या वाढली

Assembly Election : जिल्ह्यात विधानसभेसाठी ३७ लाखांवर मतदार, महिला मतदारांची संख्या वाढली

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या 37 लाख 27 हजार 799 एवढी झाली आहे.

निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम आखून दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी सालीमठ यांनी 6 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. (Search Name In Voter List)

मतदार यादीवर दाखल हरकती आणि दावे यांच्यावर सुनावणीनंतर काल, शुक्रवारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

हे ही वाचा : महाविद्यालयात जाताना काढली विद्यार्थीनीची छेड

जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत 53 हजार 830 मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या 33 हजार 514 पेक्षा अधिक आहे. प्रारूप मतदार यादीत जिल्ह्याची मतदारसंख्या 36 लाख 73 हजार 969 इतकी होती. (Voter Portal)

प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या 37 लाख 27 हजार 799 एवढी झाली आहे.

हे ही वाचा : नगर-मनमाड रस्त्याबाबत पालकमंत्र्यांकडून दिशाभूल; खा. लंके यांचा आरोप

त्यापैकी 9 हजार 287 पुरूष आणि 310 महिला असे एकूण 9 हजार 687 सैनिक मतदार आहेत तर इतर मतदारांची संख्या 206 एवढी आहे. घरोघरी पडताळणी मोहिमेत नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी मयत मतदार यांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. 80 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांच्या बाबतीत वारंवार आढावा घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.

जागेवर न आढळणार्‍या आणि स्थलांतरीत मतदारांची केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत पडताळणी करून वगळणी करण्यात आली. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत एकूण 16 हजार 516 मतदारांची वगळणी करण्यात आली. दरम्यान, अंतिम यादी प्रसिध्दीनंतरही सततचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांची नाव नोंदणी सुरू राहील, असे प्रशासनाने कळविले आहे. (Voter List 2024)

हे ही वाचा : चोरट्याची हिंमत तर पहा… भरदिवसा घरात घुसून महिलेला लुटले!

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार

अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात शेवगाव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 92 हजार 447 पुरूष आणि 1 लाख 76 हजार 290 महिला असे सर्वाधिक 3 लाख 68 हजार 743 मतदार आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघात 1 लाख 37 हजार 636 पुरूष, 1 लाख 25 हजार 305 महिला असे एकूण 2 लाख 62 हजार 942 मतदार आहेत. संगमनेरमध्ये 1 लाख 46 हजार 623 पुरूष, 1 लाख 38 हजार 415 महिला असे एकूण 2 लाख 85 हजार 40 मतदार आहेत. शिर्डीमध्ये 1 लाख 47 हजार 378 पुरूष, 1 लाख 40 हजार 830 महिला, असे एकूण 2 लाख 88 हजार 216 मतदार आहेत. कोपरगावमध्ये 1 लाख 44 हजार 606 पुरूष, 1 लाख 40 हजार 889 महिला असे एकूण 2 लाख 85 हजार 501 मतदार आहेत.

हे ही वाचा : खा. अमोल कोल्हेंना मोबाईलवरून शिवीगाळ; संगमनेरातून महसूल कर्मचारी…

श्रीरामपुरमध्ये 1 लाख 54 हजार 310 पुरूष, 1 लाख 50 हजार 950 महिला असे एकूण 3 लाख 5 हजार 326 मतदार आहेत. नेवासामध्ये 1 लाख 44 हजार 860 पुरूष, 1 लाख 34 हजार 830 महिला असे एकूण 2 लाख 79 हजार 694 मतदार आहेत. राहुरीमध्ये 1 लाख 65 हजार 275 पुरूष, 1 लाख 52 हजार 188 महिला असे एकूण 3 लाख 17 हजार 464 मतदार आहेत. पारनेरमध्ये 1 लाख 78 हजार 753 पुरूष, 1 लाख 67 हजार 214 महिला असे एकूण 3 लाख 45 हजार 970 मतदार आहेत. नगर शहरमध्ये 1 लाख 58 हजार 430 पुरूष, 1 लाख 52 हजार 807 महिला असे एकूण 3 लाख 11 हजार 344 मतदार आहेत. श्रीगोंदामध्ये 1 लाख 74 हजार 383 पुरूष, 1 लाख 60 हजार 280 महिला असे एकूण 3 लाख 34 हजार 665 मतदार आहेत तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाख 79 हजार 658 पुरूष, 1 लाख 63 हजार 236 महिला असे एकूण 3 लाख 42 हजार 894 मतदार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या