Tuesday, April 29, 2025
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले थांबेनात! कॅप्टनसह चार जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले थांबेनात! कॅप्टनसह चार जवान शहीद

श्रीनगर । Shrinagar

गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) दहशतवादी कारवायांनी (Terrorist Attacks) पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

आता जम्मू-काश्मीरमधील डोडा (Doda) जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस सोमवारपासून येथे शोध मोहीम राबवत होते. शोध सुरू असताना गोळीबार करत दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला. यामध्ये पाच जवान गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; थोरल्या पवारांची भेट की आणखी काही?

शहीद झालेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांमध्ये कॅप्टन ब्रिजेश थापा हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचे होते आणि कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र आणि कॉन्स्टेबल अजय हे राजस्थानमधील झुंझुनूचे होते. नायक डी राजेश यांची माहिती समोर आलेली नाही. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाचे जवान प्रत्युत्तर देत असल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

हे देखील वाचा : बेईमान लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार; नाना पटोले प्रंचड संतापले!

दरम्यान, डोडा महामार्गापासून नजीकरच्या सर्व परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागामधील प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर सुरक्षा दलाकडून करडी नजर ठेवली जात आहे. महिन्याभरात डोडामध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. जून महिन्यातही दोन दिवसांमध्ये इथं दोनदा दहशतवादी हल्ले झाले होते. जिथं लष्कराच्या जवानांवर निशाणा साधत त्यांनी हल्ला चढवला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....