Sunday, September 29, 2024
Homeधुळेधुळ्यातील व्यापार्‍याची 40 लाखात फसवणूक

धुळ्यातील व्यापार्‍याची 40 लाखात फसवणूक

धुळे । प्रतिनिधी dhule

प्लॉटवर बोजा असल्याची माहिती लपवून ठेवत प्लॉट विक्री व्यवहारात येथील व्यापार्‍याची शहा-मंत्री दाम्पत्याने 40 लाखात फसवणूक (Fraud) केली. त्यानंतर हे दाम्पत्य रफुचक्कर झाले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

व्यापारी मनोज गुलाबराव नाशिककर (वय 54 रा. प्लॉट नंबर 6, नंदनवन बँक कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी पश्चिम देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी सन 2011 ते 2018 या कालावधीत दिनेश मदनलाल शहा- मंत्री व त्यांची पत्नी चंचलाबेन दिनेश शहा-मंत्री या दाम्पत्याने त्यांच्या मालकीची पौर्णिमानगर, देवपूर येथील सर्व्हे नंबर व 34/3 यातील क्षेत्र 283.06 प्लॉट नंबर से 21 ही मिळकत विक्री करण्यासाठी मनोज नाशिककर यांच्याकडून त्यांच्या राहते घरी वेळोवेळी धनादेशाद्वारे 40 लाख रुपये घेतले. मात्र या मिळकतीवर फायनान्स कंपनीचे कर्ज व जीएसटी विभागाचा बोजा असल्याची माहिती मनोजर नाशिककरांपासून लपवून ठेवली. तसेच मिळकत विक्री करतांना खोटी सौदा पावती लिहून देत नाशिककर यांची फसवणूक करीत विश्वासघात केला. सौदा पावतीप्रमाणे नाशिककर यांना मिळकत न विकता त्यांच्याकडून वेळोवेळी धनादेशामार्फत घेतलेले 40 लाख रुपये घेऊन शहा-मंत्री दाम्पत्य पसार झाले आहे. त्यानुसार या दांपत्याविरुध्द पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या