Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात ४४१ करोना रुग्ण वाढले; शहरातील २८० रुग्णांचा समावेश

नाशिक जिल्ह्यात ४४१ करोना रुग्ण वाढले; शहरातील २८० रुग्णांचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी

एकीकडे करोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे करोनाबाधितांची वाढलेली संख्या प्रशासनाचे डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या कमालीची घटली होती. मात्र, आज अचानक सायंकाळी ४४१ रुग्ण संपूर्ण जिल्ह्यात बाधित आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात आज वाढलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणच्या १४१ रुग्णांचा समावेश आहे. तर, नाशिक मनपा क्षेत्रात सर्वाधिक २८० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. मालेगावमध्येही करोनाचे १३ रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हाबाह्य रुग्णामध्येही ७ रुग्णांची भर पडली आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात 4 रुग्ण करोनामुळे दगावले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण मृतांची संख्या 1 हजार 777 वर पोहोचली आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रात दोन रुग्ण दगावले आहेत तर नाशिक ग्रामीणमध्ये दोन रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक मनपा क्षेत्रात आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ५५२ वर गेली आहे. एकूण करोना रुग्णांची संख्या ६५ हजार ९१४ वर पोहोचली आहे.

तर आतापर्यंत नाशिक शहरात ९०१ मृत्यू झाले आहेत. तसेच ६३, ५२४ रुग्णांनी करोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत १ हजार ४८८ रुग्ण उपचार घेत आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैंकी एक रुग्ण तपोवन रोड परिसरातील ७५ वर्षीय व्यक्ती आहे तर दुसरा रुग्ण ३६ वर्षीय व्यक्ती स्वारबाबा नगर, हनुमान चौक,सातपूर येथील असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या