Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत विशेष : सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ४५ गावांमध्ये आता ‘स्मार्ट व्हिलेज’

देशदूत विशेष : सुंदर गाव पुरस्कार प्राप्त ४५ गावांमध्ये आता ‘स्मार्ट व्हिलेज’

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार (RR Patil Sundar Gaon Award) प्राप्त जिल्ह्यातील ४५ गावांत आता ‘स्मार्ट व्हिलेज’ची संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्यातील तीन अशी ४५ गावांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

निवडलेल्या गावांसाठी (Villages) प्राधान्याने रोपवाटिका व वृक्षसंवर्धन, गावातील घनकचर्‍याचे व्यवस्थापन, गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलनि:सारण गटारे, रस्त्यावरील दिवाबत्ती-सौर पथदिवे, अपारंपारीक उर्जा विकास व वापर, दहन-दफन भूमी बांधकाम व त्यासाठी आवश्यक इतर सोईसुविधा, स्मृतीउद्यान, ग्रामपंचायती अंतर्गत गावे व वाडयांना जोडणारे साकव बांधकाम, उद्याने व बसथांबा ही विकासकामे (Development Works) केली जाणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी याबाबत नियोजन सुरू केले आहे. प्राथमिक स्तरावर ३६ निकषांवर काम करण्यात येत आहे. त्यातून स्मार्ट व्हिलेज संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरीता ग्रामोथ्थान अभियान सुरु केले आहे. भैातिक, सामाजिक व उत्पन्न साधने या तीन क्षेत्रात शासनाच्या आर्थिक, तांत्रिक व प्रशासकिय सहकार्याने, लोकांच्या पुढाकाराने हा विकास होणार आहे. यापैकी दर्जेदार भौतिक मुलभूत सुविधा साठीचा हा कार्यक्रम आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस लोकसंख्या (Population) वाढत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होत आहे. त्यामुळे अनेक विषय मुळ धरु पाहत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गांवाची निमिर्ती काळाची गरज आहे, म्हणून शासनाने पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना सन २०१०-११ मध्ये सुरु केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. यामुळे ४५ गावांचा काही अंशी कायापालट होण्याची आशा निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तालुकानिहाय निवड झालेली गावे पुढीलप्रमाणे

नाशिक : दरी, मुंगसरे, कोटमगाव
इगतपुरी : शिरसाठे, मोडाळे, नागोसली
त्र्यंबकेश्वर : वेळुंजे, काचुर्ली, आंबोली
पेठ : कोपुर्ली बु., शेवखंडी, बोरवठ
सुरगाणा : बुबळी, हातरुंडी, म्हैस खडक
दिंडोरी : करंजवण, कोल्हेर, गोंडेगाव
कळवण : सुळे, नांदुरी, मेहदर
बागलाण : पिंपळदरे, रातीर, नवे निरपुर
देवळा : वरवंडी, खालप, माळवाडी
चांदवड : राजदेरवाडी, हिरापुर, नन्हावे
मालेगाव : निळगव्हाण, बेळगाव, मुंगसे
नांदगाव : बोराळे, श्रीरामनगर, भालुर
येवला : महालखेडा, सायगाव, एरंडगाव खु.
निफाड : थेरगाव, आहेरगाव, साकोरे मिग
सिन्नर : वडांगळी, चिंचोली, दातली

- Advertisment -

ताज्या बातम्या