नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
- Advertisement -
महापालिका निवडणुकीसाठी नाशिक रोड विभागात एकूण सहा प्रभागातून 456 अर्ज प्राप्त आले तर 373 वैध ठरविण्यात आले असून 83 अर्ज छाननी दरम्यान अवैध झाले आहे,
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिनांक 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास महापालिकेच्या दुर्गा उद्यान येथील जवळील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता 30 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता सहा प्रभागातून प्रबल इतके अर्ज दाखल झाले तर बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली असता 373 इतके अर्ज वैध ठरवण्यात आले असून बाकीचे अर्ज काही त्रुटीमुळे 83 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.
दरम्यान उद्या व परवा उमेदवारी माघे घेण्याचा दिवस असून कोण उमेदवार मागे घेतो व कोण रिंगणात राहणार याबाबतचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.




