Saturday, July 27, 2024
Homeजळगावजिल्ह्यात आढळले ४६७ कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात आढळले ४६७ कोरोनाबाधित रुग्ण

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात शनिवारी पुन्हा नव्याने 467 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 46 हजार 275 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 184, जळगाव ग्रामीणमधील 18, भुसावळ येथील 30, अमळनेरातील 39, चोपडा येथील 18, पाचोरा येथील 17, भडगावातील 27, धरणगाव 05, यावल येथील 07, एरंडोल येथील 05, जामनेरातील 32, रावेर येथील 30, पारोळा येथील 25, चाळीसगावमधील 08, मुक्ताईनगरातील 10, बोदवड येथील 10 परजिल्ह्यातील 02रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 37 हजार 552 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 771 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 8 हजार 035 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 10 रुग्ण शनिवारी दगावले.

यापैकी चार मृत्यू शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, तीन मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, एक मृत्यू अमळनेर, एक मृत्यू भुसावळ, एक मृत्यू आरुश्री हॉस्पिटल येथे झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये भुसावळ तालुक्यातील 54,59,69,84 वर्षीय पुरुष, जळगाव शहरातील 42,72,90 वर्षीय महिला, अमळनेर तालुक्यातील 74 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 57 वर्षीय महिला, धरणगाव तालुक्यातील 72 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या