Sunday, November 17, 2024
Homeनगरजिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना ५ कोटी ४० लाखांचे बक्षीस

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना ५ कोटी ४० लाखांचे बक्षीस

अहमदनगर | प्रतिनिधी

माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये नगर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना ५.४० कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले आहे. यासह राज्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानात जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उत्कृष्ठ काम केले असून यामुळे राज्याच्या यादीत नगर जिल्ह्याला मोठी संधी मिळाली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासह अभियानाचे नोडल अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विस्ताराधिकारी, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर, संबंधित गावचे सरपंच यांनी मोठे योगदान दिले आहे.

जिल्ह्यात अभियानात यशस्वी झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये संवत्सर (ता. कोपरगाव 75 लाख), घुलेवाडी (ता. संगमनेर) 75 लाख, मिरजगाव (ता. कर्जत) 75 लाख, लोणी बुद्रुक (ता. राहता) 50 लाख, गुंजाळवाडी (ता. संगमनेर) 15 लाख, वाघोली (ता. शेवगाव) 50 लाख, खांडगाव (ता. संगमनेर) 50 लाख, आव्हाने बु. (ता. शेवगाव) 50 लाख, पेमगिरी (ता. संगमनेर) 15 लाख, चिंचोली गुरव (ता. संगमनेर ) 15 लाख, लोणारे (ता. कर्जत) 15 लाख, तिगाव (ता. संगमनेर) 50 लाख, जाफराबाद (ता. श्रीरामपूर) 50 लाख, चौकाते 15 लाख आणि धांदरफळ बु. (ता. संगमनेर) 15 लाख असे पारितोषिक जाहीर झाले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या